*हिंदू हेल्पलाईनचां माध्यमातून मृत्युमुखी पडलेल्या माकडावर अंत्यसंस्कार*
*ओल्ड संभाजीनगर येथील मुबारक मुल्लानी यांच्या घराच्या टेरेस वर माकडाच्या मृत्यू झाला होता मुबारक मुल्लानी यांनी याची माहिती हिंदू हेल्पलाईनचे किडणी येथील कार्यकर्ते विजय शिंदे यांना दिली यावेळी विजय शिंदे यांनी समाधी मठाचे सागर श्रीखंडे यांना या घटनेची माहिती दिली सागर श्रीखंडे यांनी हिंदु हेल्पलाईन चे कार्यकर्त्यासह मुबारक मुल्लानी यांच्या घरी मरण पावलेल्या माकडाची पाहणी केली यावेळी हिंदु हेल्पलाईन चे कार्यकर्ते सागर श्रीखंडे यांनी नगापलिका चे कमिशन जगदीश हुल्लगीजी आणि फॉरेस्ट अधिकारी प्रभाकर गोकाक यांना कॉल करून महिती दिली यावेळी नगरपालिका कडून jcb ची वेवस्था करून देण्यात आली
तसेच फॉरेस्ट अधिकारी प्रभाकर गोकाक यांचे ही मोलाचे सहकार्य मिळाले यावेळी सागर श्रीखंडे सह कार्यकर्ते यांनी माकडावर अंत्यसंस्कार केले यावेळी नगरपालिकेचे हेमंतसिंग रजपूत, फॉरेस्ट अधिकारी प्रभाकर गोकाक, हिंदु हेल्पलाईनचे प्रमूख कार्यकर्ते विजय शिंदे, आकाश स्वामी, विजय गोंधळी,संघर्ष नाईकवाडे, सागर श्रीखंडे हे उपस्थित होते यावेळी सागर श्रीखंडे यांनी हिंदु हेल्पलाईन विषयी माहिती देते वेळी सांगितली की श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू प्राणलिंग स्वामीजी यांचा प्रेरणेतून आणि मार्गदर्शन खाली निपाणी आणि निपाणी परिसरामध्ये हिंदु हेल्प लाईन सूरू केली आहे या हेल्प लाईन च्य माध्यमातून निपाणी आणि निपाणी परिसरातील समाजातील लोकांचा आडीअडचणी दूर करण्यासाठी सूरु केली आहे
या हिंदु हेल्पलाईन चां माध्यमातून लोकांना मदत करत आहोत तसेच प्राणी पक्षी यांचा साठी ही हिंदु हेल्पलाईन ची मदत मोलाची ठरली आहे. निपाणी आणि ग्रामीण भागातील कोणाला कसली अडचण,त्रास, शासकीय मदत, आरोग्य, कायदेशीर मदत, पाहिजे असेल तर त्यांनी हिंदु हेल्पलाईन चे कार्यकर्ते यांना संपर्क करावे असे आव्हान हिंदु हेल्पलाईन चे कार्यकर्ते सागर श्रीखंडे यांनी केले*