गृहरक्षक दल दिनानिमित्त शहरात पतसंचलन
बेळगाव:ग्रहरक्षक दल दिनाच्या औचित्य साधून शहरातील प्रमुख मार्गांवर गृहरक्षक दलाच्या वतीने पतसंचलन करण्यात आले. यामध्ये कर्नाटक गृह रक्षक दल व पौर रक्षण विभागाच्या वतीने हे पतसंंचलन करण्यात आले.शहरातील मध्यवर्ती ठिकाण कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून या पतसंचलनाला सुरुवात झाली.
काकतीवेस, शनिवार पेठ,गणपत गल्ली,खाडेबाजार, रामदेव गल्ली,समादेव गल्ली,कॉलेज रोड, कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून सिविल हॉस्पिटल येथे सांगता करण्यात आले.त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथील सभागृहामध्ये गृह रक्षक दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला. यामध्ये या दिनाचे महत्त्व गृहलक्षक दलाच्या जवानांना समजावून सांगण्यात आले.