**नव्या पिढीत सृजनात्मकता नवनिर्मितीची कला जन्मजात : रणजित चौगुले*
*मराठा एकता एक संघटना तर्फे गुणगौरव 100 पेक्षा अधिक शाळेतील यशवंत विद्यार्थी शिक्षक पालकांचा सन्मान आणि मार्गदर्शन पर व्याख्यान*
बेळगांव, ( तारीख 5) : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे त्यामुळे निश्चित ध्येय बाळगा आणि त्या दृष्टीने नियोजन करून मार्गक्रमन करणे महत्त्वाचे आहे. यशाला शॉर्टकट नसतो. कष्टाशिवाय त्याला पर्याय नाही. यशाचे वाटेकरी अनेक असतात परंतु अपयशाला ती व्यक्तीच कारणीभूत धरली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये स्वतःचे मूल्यांकन करून स्वतःची ताकद ओळखावी. प्रत्येकाकडे सृजनात्मकता नवनिर्मितीची कला असते त्याचा उपयोग करून आयुष्यात यशस्वी व्हावे. भविष्यात काय करायचं हे स्पष्ट असेल तर निर्णय घेताना अडचणी येत नाहीत. तरी नेमकं काय करायचं याबाबत अजून गोंधळात असाल तर पुढील माहिती नक्कीच उपयोगी ठरेल.
*असे उदगार प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सरकारी सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी काढले.*
मराठा एकता एक संघटन बेळगाव गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी दुपारी 4 वाजता शानबाग हॉल युनियन जिमखाना कॅम्प बेळगाव येथे गुणगौरव सोहळा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात इयत्ता दहावी एसएससी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या 100 पेक्षा अधिक शाळातील यशवंत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा विशेष सन्मान गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा एकता एक संघटना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नारायण झंगरूचे होते. प्रमुख वक्ते म्हणून सरकारी सरदार हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले, प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या उपमहापौर रेश्मा पाटील, कवी प्राध्यापक निलेश शिंदे, शाहीर वेंकटेश देवगेकर, आदित्य पाटील , संदीप ओऊळकर , विजय तीपानाचे, गोपाळ पाटील , विठ्ठल वाघमोडे नारायण झंगरूचे, नारायण सांगावकर, निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
गणेश फोटो पूजन उपमहापौर रेश्मा पाटील , छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन गजानन मिसाळे , श्री महालक्ष्मी फोटो पूजन माजी नगरसेवक अनिल पाटील , महात्मा ज्योतिबा फुले फोटो पूजन सारंग देसाई व सागर झंगरुचे , सावित्रीबाई फुले फोटो पूजन नारायण सांगावकर , डॉ बाबासाहेब आंबेडकर फोटो पूजन विठ्ठल वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले; वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
स्वागत अमोल जाधव यांनी केले. प्रास्ताविक शिवाजी कंग्राळकर यांनी केले. परिचय कल्लाप्पा पाटील , राजकिरण नाईक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी उपमहापौर रेश्मा पाटील, वेंकटेश देवगेकर , प्रमुख वक्ते रणजीत चौगुले आणि अध्यक्षीय समारोप नारायण झंगरूचे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी बेळगाव भागातील शंभर पेक्षा अधिक शाळातील विद्यार्थी शिक्षक पालक यांचा विशेष गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. संजीवनी खंडागळे आणि कवी शिवाजी शिंदे यांनी विशेष प्रभावी सूत्रसंचालनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. आभार प्रा. नितेश शिंदेयांनी मानले. यावेळी जे. बी. मुतगेकर, एम.बी. शेडबाळे, किसन नावगेकर, परशराम जाधव, मुरारी पाटील, राहुल जाधव, विठ्ठल देसाई, काशी तारीहाळकर, जे. के. जाधव गजानन धामनेकर, बबन भोबे, राजू कंगराळकर, विजय चौगुले, केशव सांबरेकर, ज्ञानेश्वर पाटील, विनायक पाटील, उदय पाटील तसेच व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी सदस्य प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक कर्मचारी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.