This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*अपघातातील जखमीला रुपये ४६ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश*

*अपघातातील जखमीला रुपये ४६ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अपघातातील जखमीला रुपये ४६ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश

बेळगाव: मोटर वाहन अपघातामध्ये जखमी झालेल्या युवकाला अपघाताची नुकसान भरपाई म्हणून एकूण रक्कम रुपये ४६ लाख रुपये देण्याचा आदेश पाचवे जिल्हा व सत्र न्यायाधीशा श्रीमती के कांतीयानी यांनी नॅशनल विमा कंपनीला नुकताच दिला.

सदर अपघाता विषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक २०/१०/२०१९ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास कंग्राळी खुर्द येथील युवक श्री देवराज निलजकर व इतर प्रवासी एका ऑटो रिक्षा मधून कडोली होऊन बेळगावकडे प्रवास करत असते वेळी ते बेळगाव कडोली रस्त्यावर कडोली गावच्या हद्दीमध्ये बसवांना मंदिर नजीक १ मॅक्सीकॅब वाहन चालकाने आपले वाहन बेळगाव कडून कडोलीकडे अति वेगाने व निष्काळजीपणाने चालवून सदरच्या प्रवासी रिक्षाला जोराची धडक दिली. सदरच्या अपघातामध्ये देवराज निलजकर यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागाला गंभीर दुखापत झाली होती.अपघातानंतर त्याला विजय हॉस्पिटल बेळगाव येथे दाखल करण्यात आले होते. सदर अपघाताची नोंद काकती पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती.पोलिसांनी सदर अपघाताची सखोल तपास करून सदर मॅक्सिकॅब वाहन चालकाविरुद्ध दोषा रोपण दाखल केला होता.

सदर अपघातामध्ये झालेल्या गंभीर दुखापतीची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जखमी देवराज निलजकर यांनी जिल्हा न्यायालयामध्ये सदरच्या वाहन मालक व विमा कंपनीविरुद्ध दावा दाखल केला होता.सदर दाव्यामध्ये जखमी कडून संपूर्ण पुरावे व साक्षर नोंदविण्यात आली होती. सदर साक्षी पुराव्यांच्या आधारे व त्याची बाजू ऐकून घेऊन सदरच्या दावा मंजूर करून जखमेला भरपाई म्हणून व्याजासहित एकूण 46 लाख देण्याचा आदेश विमा कंपनीला दिला . जखमीच्या वतीने ॲड सुधीर चव्हाण यांनी काम पाहिले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24