छगन भुजबळ यांना न्यायालयाने बजावली नोटीस
समता परिषदेच्या मेळाव्यात मराठा समाजाबद्दल खोटे व अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल सतीश भास्कर काळे राहणार अकरा आनंद रेसिडेन्सी कन्हैया पार्क थेरगाव पुणे यांनी न्यायालया मधून छगन भुजबळ यांच्या विरोधात नोटीस बजावली आहे.
या नोटिसीमध्ये वकील अतुल पाटील यांनी त्यांचे अशील सतीश काळे यांची बाजू मांडत असे म्हटले आहे की सतीश काळे हे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे प्रतीत यश संघटक आहेत ते सकल मराठा समाजाच्या सर्व उपक्रम व आंदोलनात सक्रियपणे सहभागी असतात ते सध्या संभाजी ब्रिगेड या संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी कार्यरत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी 7 सप्टेंबर 2023 रोजी ते नऊ तारखेपर्यंत पिंपरी चिंचवड येथे आमरण उपोषण केले होते व उपोषणाने तब्येत खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
त्यांनी उपोषणामध्ये मराठा आरक्षणाची मागणी ही कोणत्याही जातीच्या किंवा व्यक्तीच्या विरुद्ध नाही तरीदेखील गेल्या काही दिवसांपासून तुम्ही दोन समाजात मराठा ओबीसी ते निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे छगन चंद्रकांत भुजबळ यांच्या विरोधात न्यायालयांमधून अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल नोटीस बजावत असल्याचे नोटिसीद्वारे सांगितले आहे.
12 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथे समता परिषद या संघटनेच्या मेळाव्यात भाषण करताना 14- 10- 2023 रोजी मौजे अंतरवली सराटी येथे आयोजित सभेबद्दल कुचेष्टा करणारी व समस्त मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्य केली आहेत असे सतीश काळे यांनी TV9 या दूरचित्रवाणी वरील बातमी पत्रकात ऐकले आहे त्यामुळे समाजाबद्दल खोटे व अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावली आहे.
तसेच छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावणारी केलेली वक्तव्य त्वरित मागे घेऊन सकल मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा सतीश काळे हे त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करतील आणि त्यानंतर पुढे होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार असाल असे पत्रकार द्वारे त्यांना कळविले आहे.
lnfc9e
a52vem
q6c1w9
kl9zv0
7knshc
vab49a
2nvtco
e6epaw
s5n17r
g1aeib
fujk4v