काँग्रेसच्या प्रजाध्वनी बस यात्रेला बेळगाव मधून प्रारंभ
टिळकवाडी येथील काँग्रेस विहीर विरसौध जवळ आज काँग्रेसच्या प्रजाध्वनी बस यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजप हटाव देश बचावa असा नारा दिला आणि केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रजाध्वनी बस यात्रेचे उद्घाटन करून त्याला चालना दिली.
त्यानंतर ब्रिटिश सरकार विरुद्ध तीव्र लढा देण्याची शपथ बेळगावातील या ऐतिहासिक वीर सौध मध्ये घेण्यात आल्याची आठवण याप्रसंगी करून देण्यात आली. 99 वर्षापूर्वी बेळगाव मध्ये तत्कालीन काँग्रेसचे अधिवेशन टिळकवाडी येथील काँग्रेस विहीर वीरसौध मध्ये भरले होते.