काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
मोदी या आडनावावर केलेल्या टिकेनंतर सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना तात्काळ जामीन ही मंजूर झाला.
तसेच या निर्णयानंतर 24 तासांच्या आत त्यांची खासदारकीही देखील रद्द करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर कोणत्याही क्रिमिनल केस मध्ये खासदार आणि आमदारांना दोन वर्षाहून अधिक शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्यांचे सदस्य म्हणजे संसद आणि विधानसभा रद्द केले जाते.
इतकेच नव्हे तर शिक्षेची मुदत पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा वर्षापर्यंत कोणतीही निवडणूक लढता येत नाही.
त्यामुळे या कायद्यानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
त्यामुळे आता दोन वर्षानंतर त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर सहा वर्षापर्यंत त्यांना कोणत्याही प्रकाराची निवडणूक लढता येणार नाही.या निवडणुकीवर कायद्यानुसार बंदी आहे. लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे.