गॅस सिलिंडर , डिझेल,पेट्रोल वगैरे जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा युवा काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात डोक्यावर सिलिंडर घेऊन आणि लहान मुलांची खेळायची कार घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते.वीर राणी कित्तूर चन्नमा चौकात रास्ता रोको करण्यात आला.
भाववाढ करून देशातील सर्वासामान्य जनतेवर केंद्रातील भाजप सरकार अन्याय करत असल्याचा आरोप करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच दरवाढीच्या विरोधात मोर्चाने जावून जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन सादर करण्यात आले.
भारतीय युवा काँग्रेसच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी, आमदार असिफ (राजू) सेठ बेळगाव जिल्हा ग्रामीण युवा काँग्रेस अध्यक्ष कार्तिक पाटील, शहर अध्यक्ष सागर दिवटगी व चिक्कोडी जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष सिद्दिक अंकलगी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल औषधे बांधकाम साहित्य गॅस सिलेंडर वगैरे जीवनावश्यक गोष्टींची दरवाढ केल्याबद्दल केंद्रघोषणाबाजी करण्यात आली.सरकारच्या विरोधात
चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी पोलिसांनी मोर्चाला रोखले. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भ्रष्ट भाजप सरकारचा धिक्कार असो, मोदी हटावो देश बचावो वगैरे घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेड हटवून राहुल जारकिहोळी यांच्यासह निवडक युवा काँग्रेस नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यास सोडले.