स्वतः अपघात करून काच फोडल्याची कबुली
मराठी बोलणाऱ्या लोकांनी दगडफेक करून वाहनाची काच फोडली म्हणून पोलिसात तक्रार दिलेल्या वाहन चालकाचा बनाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असून स्वतः अपघात करून काच फोडल्याची कबुली वाहन चालकाने पोलिसांना दिली आहे.
https://facebook.com/1797642893950519
बंगलोर येथून चामराज पेठ येथून चेतन एन. व्हीं.हा वाहनचालक बेळगावला अधिवेशनासाठी बुधवारी सकाळी निघाला होता.बेळगावला येताना वाहनचालकाने तडस येथे थांबून बारमध्ये दारू ढोसली .नंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने स्टील बार भरून नेणाऱ्या ट्रकला वाहनाची धडक दिली आणि बोलेरो जीपची काच फुटली.आता आपल्याला वरिष्ठ ओरडतील म्हणून वाहन चालकाने सुवर्ण सौध येथे राष्ट्रीय महामार्गावर मराठी बोलणाऱ्या लोकांनी वाहनावर दगडफेक करून काच फोडली असा बनाव रचला.पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तक्रार देण्यासाठी चालकाला हिरे बागे वाडी पोलीस स्थानकात बोलवले.यावेळी हिरे बागे वाडी येथील टोल नाक्यावरील सी सी टी व्हि. फुटेाज पोलिसांनी तपासले असता अगोदरच काच फुटल्याचे समजले.नंतर वाहन चालकाने आपली चूक लपविण्यासाठी मराठी बोलणाऱ्या लोकांनी दगडफेक केल्याचे नाटक रचल्याचे कबूल केले.