‘मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
15 जून’23 रोजी टीम केअर फॉर यू ने लोककल्प फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यालय, जांबोटी येथे इयत्ता 7 वी ते 10 वीच्या मुलींसाठी ‘मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेला माध्यमिक विद्यालय, मराठी प्राथमिक शाळा आणि कन्नड प्राथमिक शाळेतील मुलींनी सहभाग घेतला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य महेश साडेकर यांच्यासह शीतल भंडारी, गौरी गजबार, निशिगंधा, संतोष कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निशिगंधा कानूरकर आणि असीमरजा तत्वमसी यांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मासिक पाळी या विषयावर चर्चासत्र आयोजित केले परंतु वेगळ्या दृष्टीकोनातून मासिक पाळीच्या जनजागृती मोहिमेला स्टोरी टेलिंगद्वारे भरतनम नृत्याद्वारे सर्वांसमोर सादर केले.
ही कार्यशाळा मुलींच्या मासिक पाळीसंबंधी आरोग्याबाबत जनजागृती आणि शंकांचे निरसन करण्यात उपयुक्त ठरली.यावेळी सुश्री निशिगंधा यांनी मासिक पाळी हा एक असा विषय आहे जो प्रत्येक व्यक्तीने सामान्य केला पाहिजे असे सांगितले.