डेंगू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन
नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे पावसामध्ये त्यांना डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया यासारखे आजार उद्भवू नये याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने मांदुर गल्ली येथे डेंगू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या शिबिरात एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून लसीकरणाला सुरुवात केली.
याप्रसंगी त्यांनी गल्लीतील सर्व नागरिकांना चिकनगुनिया आणि डेंग्यू लसीकरण लस दिली. यावेळी एंजल फाउंडेशन श्रीराम सेना युवक मंडळ भांदूर गल्ली चे युवक मंडळ यांच्यासह मनोहर पै केशव शिंदोळकर देवदत्त शिंदोळकर मल्लाप्पा बद्री अजिंक्य मेंडके सुप्रिया शिन्नोळकर रजनी मेंडके लता कारेकर सरिता मडलगी उपस्थित होते