मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या आयोजन
सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी निपाणी व शिव बसव जयंती उत्सव तरुण मंडळ बुधिहाळ यांच्यामार्फत मोफत पाच दिवसीय उन्हाळी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले.
हे शिबिर 12 मे ते 17 मे या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले होते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मुलांनी व मुलींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण कला आत्मसात करून मन व मनगट मजबूत करणे आवश्यक आहे. मोबाईल टीव्ही कम्प्युटर याच्या मधून बाहेर पडून मुला-मुलींनी मैदानी खेळ खेळून शारीरिक तंदुरुस्त राहणे त्याचबरोबर लाठी काठी तायक्वादो स्वसंरक्षण प्रशिक्षण कला आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. या उद्देशाने शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये 60 पेक्षा जास्त मुला मुलींनी सहभाग घेतला होता मुला मुलींच्या कडून पंच ,ब्लॉक, कीक्स, फाईट रोड फाईट, दैनंदिन जीवनात येणाऱ्या वस्तू पासून स्वतःचे संरक्षण कसे प्रकारे करता येईल याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले व सराव करून घेण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मुख्य प्रशिक्षण श्री बबन निर्मले सह प्रशिक्षक श्री प्रथमेश भोसले व श्री देवदत्त मल्हाडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
गावातील श्री निवास पोवार व विजयकुमार पाटील व गावातील सर्व नागरिक यांचे प्रोत्साहन लाभले.