रक्त शर्करा आणि रक्तदाब तपासणी शिबिरचे आयोजन
जायंट्स मेनच्या वतीने एसपीएम रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानात रक्त शर्करा आणि रक्तदाब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
मधुमेह ही व्याधी आज सर्वांच्या परिचयाची झाली असून या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष असे, ६० व्या वर्षांच्या सरासरी आयुर्मानात पडणाऱ्या या आजाराचा विळखा आता तिशीतच पडू लागला आहे. मधुमेहाचे प्रमाण वाढते असल्याने
जायंट्स मेनने हा उपक्रम हाती घेतला होता त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे अध्यक्ष सुनिल मुतगेकर यांनी सांगितले.
दररोज छ.शिवाजी उद्यानात पहाटे फिरायला येणाऱ्या व्यक्तींची मधुमेह चाचणी आणि रक्तदाब तपासणी करण्यात आली.सकाळी साडे सहा वाजता या शिबिराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगर प्राथमिक केंद्र खासबाग आणि कर्नाटक आरोग्य प्रचार ट्रस्ट यांच्या सहकार्याने सव्वाशेहुन अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष सुनिल मूतगेकर, मोहन कारेकर, मदन बामणे,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समुदाय समन्वयक लक्ष्मी पाटील,विनायक चौगुला, आरोग्य निरीक्षक महेश बजंत्री, माजी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ,सचिव लक्ष्मण शिंदे, खजिनदार विजय बनसूर, शिवराज पाटील,अशोक हलगेकर,आशा कार्यकर्ती सुनिता पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीदेवी मगेण्णावर उपाध्यक्ष अरुण काळे , अविनाश , पाटील,विश्वास पवार , मोहन कारेकर ,पद्मप्रसाद हुली ,सुनिल चौगले, विनोद आंबेवाडीकर,राहुल बेलवलकर,सुरेश पिसे,धीरेंद्र मरळीहळ्ळी,भाऊ बंडाचे,राजू बांदिवडेकर,मधुकर पाटील, अरविंद देशपांडे , मंजुनाथ शिरोडकर,आनंद कुलकर्णी आणि अजित कोकणे उपस्थित होते.
सचिव लक्ष्मण शिंदे यांनी नागरिकांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.