सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत कलर बेल्ट परीक्षा आयोजित
*कर्नाटका ओलंपिक असोसिएशन कर्नाटका तायक्वांदो असोसिएशन बेंगलोर* यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 2 जुलै रोजी निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत कलर बेल्ट परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या परीक्षा श्री व्यंकटेश मंदिर निपाणी येथे यशस्वी उत्साहात पार पडल्या या बेल्ट परीक्षा येल्लो, ग्रीन, ग्रीन वन, ब्ल्यू ,ब्ल्यू वन, रेड, रेड वन, बेल्ट अशा विभागात आयोजित केल्या होत्या.
या बेल्ट परीक्षेदरम्यान एकूण 87 मुला मुलींनी सहभाग दर्शविला होता यावेळी पूमसे, फाईट, ब्लॉक्स, पंच, किक्स, स्वसंरक्षण, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय , तायक्वांदो स्पर्धेचे नियम व अटी सांगण्यात आले व मुला मुलींच्या कडून सराव करून घेण्यात आला या परीक्षा यशस्वी करण्यासाठी परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय पंच श्री महादेव मुतनाळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षा यशस्वी करण्यासाठी अकॅडमी चे प्रशिक्षण श्री बबन निर्मले सहपरिक्षक विजय नाईक, अनुष्का चव्हाण, प्रथमेश भोसले, देवदत्त मल्हाडे, कनिष्क सत्य नाईक यांनी परिश्रम घेतले