बेळगाव: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवजात शिशूंचा व बाळंतिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या वर्षभरात बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १२० शिशु व ११ गर्भिण्यांचा मृत्यू झाला आहे.
तसेच बेळ्ळारी मध्ये दूषित सलाईनमुळे मृत्यू झाल्याने भाजपच्या कर्नाटक महिला मोर्चा वतीने राज्यवापी मोहीम सुरू केली आहे.
मृत्यू झालेल्या कुंदरगी गावातील पूजा कडकभावी महिलेच्या घरी जाऊन भाजप महिला मोर्चा राज्य कार्यदर्शी डॉ सोनाली सरनोबत, व राज्य उपाध्यक्ष शांभवी अश्वथपुरे,बेळगाव ग्रामीण महिला अध्यक्षा डॉ.नयना भस्मे यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
याप्रसंगी गोकाक भाजप मंडल अध्यक्ष राजेंद्र गौडपगोळ, आनंद अप्पुगोळ, शिवानंद टोपगी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.