आंबेवाडी ग्रामपंचायत वर पुन्हा समितीचा झेंडा रोवला गेला आहे येथील ग्रामपंचायत वर मराठी माणसाचीच सत्ता आली असल्याने गावामध्ये पुन्हा चैतन्य चे वातावरण निर्माण झाले असून अध्यक्षपदी लक्ष्मी येळगुळकर तर उपाध्यक्षपदी शंकर सुतार यांची निवड झाली आहे.
यावेळी निवडणुकीत येळगुळकर यांना 14 मते पडली तर विरोधी गटातील सुचिता सांबरेकर यांना 11 मते पडली व एक बाद झाले तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शंकर सुतार यांना 14 मध्ये तर राजश्री तोरे यांना बारामते पडली.
यावेळी निकाल जाहीर होताच ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्रकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर आर एम चौगुले यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचे अभिनंदन करून समितीच्या पाठीशी राहून मतदान केलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
गेल्या अडीच वर्षांपूर्वी समितीने ते आर एम चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंबेवाडी ग्रामपंचायतवर चेतन पाटील यांना अध्यक्ष करून महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकवला होता तर आता पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे लक्ष्मी येळगुळकर आणि उपाध्यक्षपदी शंकर सुतार यांना निवडून दिले असल्याने फटाक्यांच्या आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंद साजरा करण्यात आला.
Hey, I think your blog might be having browser compatibility issues. When I look at your blog site in Chrome, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, excellent blog!
I like this site its a master peace ! Glad I found this on google .