गळफास घेऊन केली आत्महत्या
श्वसनाच्या आजाराला कंटाळून एका 41 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
निपाणी तालुक्यातील बोरगाव शहरात ही घटना घडली असून जितेंद्र गिरिपा गाजरे व 41 असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
श्वसनाच्या त्रासाला कंटाळून आणि घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांनी हे आत्महत्या केली आहे. सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे.