संडे हो या——
बेळगाव:
‘संडे हो या मंडे रोज खावे अंडे’ असे म्हटले जाते. रोज किमान एक तरी अंडे खावे असे म्हणतात. अंडे खाणे गुणकारी आहे असे डॉक्टरही सांगतात. त्यामुळे बरेच जण नियमितपणे अंडे खातात. सध्या तर थंडीचा सीजन सुरू असल्यामुळे अंड्यांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच साहजिकच अंड्यांच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. दर जरी वाढले असले तरी अंडी खाणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.
सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे अंड्याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळेच अर्थशास्त्रीय भाषेत सांगायचे झाले तर मागणी वाढली तर दर वाढतातच. या आधी काही महिन्यापूर्वी एक अंड्याचा दर साडेपाच रुपये असा होता.
त्यानंतर तो थोड्याच दिवसानंतर सहा रुपये झाला होता. त्यानंतर थोड्याच दिवसांनी थंडीचे प्रमाण वाढले आणि प्रति अंड्याचा दर साडेसहा रुपये होता. आता तर काही दिवसांमध्ये अंड्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली असून प्रति अंड्याचा दर रुपये सात असा झाला आहे. डझनाचा दर 84 रुपये असा झाला आहे. दर कितीही वाढला तरी खवय्यांच्या मागणीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. याउलट मागणीमध्ये वाढ होतच आहे. म्हटलेच आहे ना, ‘दाने दाने पर खानेवाले का नाम’