**विश्वमांगल्य सभेतर्फे सामूहिक स्तोत्र पठण आणि कुंमकुमार्चन कार्यक्रम**.
विश्व मांगल्य सभा बेळगाव तर्फे दिनांक 15/ 9/ 2024 रोजी महिलांसाठी सामूहिक स्तोत्र पठण व कुंकूमार्चन कार्यक्रमाचे आयोजन केले होते ,सदर कार्यक्रम शहापूर खडेबाजार येथील मारुती मंदिर मध्ये पार पडला. या कार्यक्रमास श्रीमती शशी नायर, शहापूर, बेळगाव या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी कुंकुमार्चन म्हणजे काय याची माहिती देऊन कुंमकुमार्चन लाभदायि का आहे याची भागवतातील उदाहरणे देऊन सांगितले.
प्रिया पुराणिक यांनी त्यांचा परिचय करून दिला त्यानंतर रश्मी जोगदंड यांनी स्तोत्रांची माहिती सामूहिक पठणाची माहिती व विश्वमंगल्य सभेच्या कार्याबद्दल सर्वांना सांगितले. प्रियांका केळकर यांनी सूत्रसंचालन केले ,गौरी धामणेकर व संगीता नागोजीचे यांनी प्रथम शक्तीगान व कार्यक्रमानंतर ध्वज प्रार्थना म्हटली. या कार्यक्रमांमध्ये शिवपंचाक्षरी स्तोत्र, लिंगाष्टक स्तोत्र ,दुर्गा सप्तशती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र व गणपती अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण करण्यात आले .दुर्गा सप्तशती स्तोत्र म्हणत सर्व महिलांनी कुंकुमार्चन केले .कमल कुलकर्णी यांनी त्यांच्या सुस्पष्ट स्वरात स्तोत्रपठण केले व त्यांच्याबरोबर सर्व महिलांनी म्हटले.या कार्यक्रमास बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. कुंकुमार्चन चे साहित्य विश्व मांगल्य सभेतर्फे देण्यात आले .प्रसाद स्वरूप काशीहून आणलेले रुद्राक्ष महिलांना देण्यात आले.