हिंदू देव देवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन
रविवार दि.25 जून 2023 रोजी उचगाव ता.जि. बेळगाव येथील मार्केण्डेय नदी काठाशेजारी असणाऱ्या गणपती मंदिर परिसरात सर्व लोक सेवा फौंडेशनच्या वतीने हिंदू देव देवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की बेळगाव वेंगुर्ला हायवे व मार्केण्डेय नदीकाठी गणपती मंदिर वसले आहे,या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा आणून ठेवल्या होत्या, अगदी ठेवल्या म्हणण्यापेक्षा अस्थाव्यस्त अवस्थेत वस्तीत टाकलेल्या होत्या या प्रतिमा अगदी हायवे शेजारीच असल्यामुळे अगदी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना ते बघताना देखील त्रासिक वाटायचे हे गावातील पुंडलिक पावशे यांनी हेरले .त्यांनी देखील नागरिकांना आवाहन केले, की या प्रतिमा संकलित करून आपण हा परिसर मोकळा करू ,पण याबाबत नागरिकांनी दुर्लक्ष केले तेव्हा पुंडलिक पावशे यांनी सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विरेश बसय्या हिरेमठ यांच्याशी संपर्क केला त्यांनी तात्काळ उचगाव येथील गणपती मंदिर परिसरात भेट दिली आणि तब्बल एक मारुती ओमनी भरून हिंदू देवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन केले .अशा प्रकारे प्रतिमा कशाही स्वरूपात टाकून देव देवतांचा अपमान करणे योग्य वाटत नाही असे मत श्री विरेश हिरेमठ यांनी व्यक्त केले .तसेच गावातील व्यक्तींनी परिसरात प्रतिमा ठेवत असताना भाविकांच्या प्रवाशांच्या भावना दुखावू नयेत याची देखील काळजी घ्यावी त्यामुळे बेळगाव व परिसरातील लोकांचे भाविकांचे नाव बदनाम होते अशी खंत व्यक्त केली. तसेच श्री.विरेश हिरेमठ यांनी मंदिर परिसर देखील स्वतः हातात झाडू घेऊन संपूर्ण रित्या स्वच्छ केला. या ठिकाणी कित्येक भाविक येत असतात पण फक्त देवांचे दर्शन घेऊन निघून जातात त्या ठिकाणी परिसर स्वच्छतेसाठी आपला थोडा देखील हातभार लावत नाही हे खेदजनक आहे असे मत व्यक्त केले अशा कार्यासाठी समाजातील व्यक्तींनी ,भाविकांनी पुढे येऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा श्री.विरेश हिरेमठ यांनी व्यक्त केली. सोबत श्री पुंडलिक पावशे उचगाव ,श्री देवाप्पा कांबळे, श्री बाळू कणबरकर, श्री लिंगय्या बुरलकट्टी श्री .गुरुराज वाली, श्री. गौरीश हिरेमठ इत्यादी उपस्थित होते.