स्वातंत्र्यदिनी सराफी बाजारपेठ बंद
बेळगाव – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बेळगाव सराफ व्यापारी संघ तसेच शहापूर व खडेबाजार सराफ बाजारपेठ यांच्यावतीने शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सराफी दुकाने दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेतर्फे सर्व सभासद व ग्राहकांना याबाबत कळविण्यात आले असून, स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्रीय उत्साह एकत्रितपणे साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.