साई मंदिर परिसरात स्वच्छता अभियान; नगरसेवक नितीन जाधव यांची तात्काळ कार्यवाही
बेळगाव :
वार्ड क्रमांक 29 मधील साई मंदिर परिसरात पावसामुळे पाय घसरून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक भक्तांनी नगरसेवक नितीन जाधव यांच्याकडे विनंती केली होती.
माननीय आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक नितीन जाधव यांनी तात्काळ स्प्रे मशीनच्या सहाय्याने परिसराची स्वच्छता करून घेतली. यामुळे भक्तांना मंदिरात ये-जा करताना दिलासा मिळाला आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार हे मंदिर मुजरा इलाख्याच्या हद्दीत येत असून देखभाल योग्यप्रकारे केली जात नाही, अशी नाराजीही व्यक्त केली जात आहे. तथापि, स्थानिक नगरसेवकांनी त्वरित पुढाकार घेऊन समस्या सोडविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.