देशामध्ये जवळपास 1100 ठिकाणी स्वच्छता अभियान
संत निराकारी मिशनच्या वतीने मेघा प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मिशन भारत सरकारच्या वतीने संपूर्ण देशामध्ये जवळपास 1100 ठिकाणी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बेळगाव शाखेतील संयोजक शशी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक कुमार मनचंद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला मराठा लाईट इन्फंट्री सेंटरचे मेजर सुभेदार श्री बीटी भोसले व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमात नागरिकांना पाण्याचे महत्त्व सांगण्यात आले तसेच स्वच्छ जल स्वच्छ मिशन या योजनेबद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी मिशनचे अधिकारी तुषार जी गजानन गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा दल मध्ये अनेकांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रमा दिलेल्या सद्गुरूंच्या आदेशाचे पालन केले.
यावेळी या कार्यक्रमात बेळगाव चे ज्ञान प्रचारक वी एन लहासे राजू नागवडेकर सुनील सोरटे यांनी आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न केला.
I am extremely inspired together with your writing abilities and also with the format in your weblog. Is this a paid theme or did you modify it yourself? Anyway stay up the excellent quality writing, it is rare to peer a nice weblog like this one today. !