मराठा मंडळ पदवी महाविद्यालयातर्फे स्वच्छता अभियान
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयाच्या एन.एस.एस. घटकातर्फे बेळगाव येथील अंधमाहेश्वरी शाळेमध्ये स्वच्छता अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हे अभियान महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.या अभियानामध्ये महाविद्यालयातील बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी.चे एन.एस.एस.चे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी एन.एस.एस. अधिकारी प्रा. राजू हट्टी यांनी सर्वांचे स्वागत केले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय बेन्नाळकर यांनी मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की, स्वच्छ परिसरामुळे मन आणि शरीर स्वस्थ राहू शकते. आजच्या युगामध्ये पर्यावरण दूषित होत चालले आहे. अनेक रोगराई वाढत आहेत. रोगराई पासून मुक्त जीवन जगण्यासाठी पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सर्वानी केला पाहिजे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अंधमाहेश्वरी शाळेचे पटांगण, उद्यान, वस्तीगृह आदी परिसर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचे कार्य केले.तसेच प्राध्यापक वृंद आणि स्वंसेवकानी अंधमाहेश्वरी शाळेच्या अंध विद्यार्थ्यांच्या सोबत अनेक गोष्टीवर हितगुज साधला.
या अभियानामध्ये नँक समन्वय अधिकारी प्रा.आर.एम.तेली,प्रा.सुरेखा कामुले, डॉ. डी. एम. मुल्ला, प्रा.जगदीश यळ्ळुर,प्रा.आरती जाधव, प्रा.एस.आर. नाडगौडा, डाँ.गिरी माने,प्रा.सोनाली पाटील, आणि विद्यार्थि मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. वृषाली कदम यांनी आभार मानले.