**स्वच्छता व दंडात्मक कारवाई**
*कंग्राळी खुर्द, २५ एप्रिल २०२४*
रामनवमीच्या निमित्ताने कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीने गावातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याचे व्यवस्थापन पुन्हा सुरू केले आहे. रामदेव गल्ली कॉर्नर, ज्योती नगर कॉर्नर, मार्कंडे नदीकिनारी, तसेच अलतगाव कुंडी येथील जमा झालेला कचरा काढण्यात आला. या व्यतिरिक्त, गावातील कचरा गाडी काही दिवसांपासून बंद पडल्याने नागरिकांना त्रास झाला होता, पण ती आता पुन्हा चालू करण्यात आलेली असून नियमित सेवा सुरू असणार आहे.
तथापि, ग्रामपंचायतीने स्पष्ट सूचना जारी करून रस्त्यांवर किंवा नदीकिनाऱ्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. यापूर्वीप्रमाणेच, अशा गैरवर्तनासाठी ५०० ते १००० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. ग्रामपंचायतिच्या वतीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कचरा केवळ नियोजित गाडीमध्येच टाकावा व पर्यावरणासाठी जबाबदारीने वागावे.
ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले,”स्वच्छता ही केवळ ग्रामपंचायची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नियमांना धरून चालणाऱ्यांना सहकार्य, पण गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोरपणे कारवाई होईल.” https://dmedia24.com/a-young-man-arrested-for-controversial-reels/
सर्व नागरिकांनी ह्या सूचनांचे पालन करून गाव स्वच्छ ठेवण्यात सहभाग द्यावा, अशी अपेक्षा ग्रामपंचायतकडून व्यक्त करण्यात आली आहे.