सफाई कर्मचाऱ्यांचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शशिकांत सुभाष घाभाले वय 28 राहणार ज्योती नगर गणेशपूर रोड असे त्याचे नाव असून कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सफाई कर्मचाऱ्यांचे काम करत होता. त्याने कंत्राटदार शंकर अष्टेकर यांच्या जवळून 80 हजार रुपये घेतले होते. त्यातील 50 हजार रुपये शशिकांत यांनी त्यांना परत केले त्यानंतर रक्कम 30000 या रकमेवर व्याजासह दीड लाखापर्यंत पोहोचली आणि कर्ज वसुलीसाठी शंकर यांनी तगादा लावला यावेळी त्यांनी मानसिक त्रास करून घेत आत्महत्या केली असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
मयत शशिकांत याच्या पाश्चात आई-वडील पत्नी चार मुले विवाहित भाऊ बहिणी आणि त्यांची मुले असा परिवार आहे या घटनेची नोंद कॅम्प पोलिसांना झाली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मानसिक त्रास दिल्यामुळे सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असून जोपर्यंत त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपये मिळत नाहीत आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार केले जाणार नाहीत अशी भूमिका यावेळी दलीत नेते मल्लेश चौगुले यांनी घेतली