दहावीच्या परीक्षेला 29 मार्च पासून सुरुवात
दहावीची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवली असल्याने शिक्षण खात्याची लगबग चालू झाली आहे.बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 120 परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा पार पडणार असून त्याकरिता शिक्षण खात्याने कंबर कसली आहे.
या परीक्षेकरिता जिल्ह्यातील 33 182 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत 29 मार्चपासून या परीक्षेला सुरुवात होणार असून परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा ची करडी नजर असणार आहे.
त्याचबरोबर दहावीचे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा काळ होता ही परीक्षा जवळपास 189 केंद्रावर होती कारण खबर दारीचा उपाय म्हणून सर्वांमध्ये अंतर ठेवण्यात आले होते तर यावर्षी सर्व काही सुरळी असल्याने ही परीक्षा 120 केंद्रावर पार पडणार आहे .
बेळगाव शहरात 27 केंद्रामध्ये जवळपास 8614 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर बेळगाव ग्रामीण मध्ये 19573 जण परीक्षा देणार आहेत.