जमिनीच्या वादातून लाठ्या काठ्याने हाणामारी
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील भाविहाळ गावात दोन कुटुंबात जमिनीच्या वादातून लाठ्या काठ्याने हाणामारी झाली .या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत.
महारुद्रप्पा कुंभार आणि शंकराप्पा कुंभार या दोन कुटुंबात जमिनीचा वाद सुरू असून शंकरप्पा याने या प्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
जमिनीतील सागवानाची झाडे तोडून नेत असताना त्याला दुसऱ्या कुटुंबाने आक्षेप घेतला.त्यामुळे दोन कुटुंबातील सदस्यांत हाणामारी झाली.हाणामारीत लाठ्या का ठ्यांचा मुक्तपणे वापर करण्यात आला.या हाणामारीत महिलांना देखील सोडले नाही. https://www.instagram.com/reel/CsqahreB-8a/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
चार जण हाणामारीत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बैलहोंगल येथील तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणाची बैलहोंगल पोलिसात नोंद झाली आहे.