घरगुती गॅस सिलेंडर साठी आता नागरिकांना 1112 रुपये मोजावे लागणार*
आधीच कोलमडलेले महिलांचे आर्थिक बजेट पुन्हा विस्कळीत झाले आहे कारण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच दरवाढीमुळे कात्री लागली होती. तर आता सातत्याने होत असलेल्या दरवाढमुळे सामान्य नागरिकांचा खिसा पुरता खाली झाला आहे.
यामुळे सामान्य नागरिक हातात झाली असून या दरवाढीमुळे डोकेदुखी वाढली आहे. आज पासून घरगुती गॅस सिलेंडर साठी नागरिकांना अकराशे बारा (1112) रुपये मोजावे लागणार आहेत.
त्याचबरोबर कमर्शियल सिलेंडर दरात देखील 350 रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे आता पोटाला खायचे काय की फक्त गॅसलाच पैसे घालायचे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.