बेळगाव:हिंडलगा कारागृहातील जांमर लावल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोबाईल नेटवर्क समस्या उद्भवत आहे. गावामध्ये कोणत्याच कंपनीचे नेटवर्क येत नाही आहे. त्यामुळे कुणाशी संपर्क करायचं असल्यास संपर्क होत नाही आहे. हिंडलगा परिसरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हि बाब लक्षात घेऊन हिंडलगा ग्रामपंचायतीच्या वतीने हिंडलगा कारागृहातील जामर फक्त कारागृहाच्या आत मध्ये लावावा . जेणेकरून स्थानिक जनतेला नेटवर्कच्या समस्या उद्भवणार नाहीत. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी हिंडलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.