वंटमुरी भागातील नागरिकांचा पाठिंबा राजू सेठ यांना
काँग्रेसचे बेळगाव उत्तर मतदारसंघातील उमेदवार आसिफ (राजू) सेठ यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून सोमवारी सकाळी वंटमुरी कॉलनीला भेट दिली. यावेळी त्यांनी बुधवार दिनांक , 10 मे रोजी लोकांना बाहेर जाऊन मतदान करण्याचे आवाहन मतदारांच्या घरी जाऊन केले .
यावेळी वंटमुरी कॉलनीतील नागरीकांनी त्याचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले, त्यांच्या प्रचारात त्यांना साथ दिली आणि त्यांचा पाठिंबा दर्शविला. या क्षेत्रासाठीच्या आपल्या योजनांबद्दल बोलताना ते म्हणाले की अनेक क्षेत्रांवर काम करण्याची गरज आहे आणि रहिवाशांच्या पाठिंब्याने त्यांना काम करायचे आहे.
24×7 नळपाणी सुविधा, परवडणारी घरे, आरोग्य सेवा आणि मुलांसाठी शिक्षण हे सध्याचे प्राधान्य असून, बेळगावच्या जनतेला मदत आणि पाठबळ देण्यासाठी आपण सदैव उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.