ठळकवाडी हायस्कूल चा विद्यार्थी आणि रघुनाथ पेठ अनगोळ येथील रहिवासी रजित गौरब 14 याचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. सदर घटना भाग्यनगर 10 क्रॉस येथील गोमटेश विद्यापीठाच्या समोर घडली आहे.
ज्यावेळी त्याला शॉक लागला त्यावेळी त्याला दवाखान्यात करण्याऐवजी नागरिक हातावर हात ठेवून पाहात थांबले होते. या घटनेने माणुसकीला कळंक फासले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की रजित हा पेपर टाकण्याकरिता आज भाग्यनगर येथे गेला होता यावेळी येथील एका घर मालकाने आज अमावस्या असल्याकारणाने तुला दोनशे रुपये देतो कार गाडी वॉश करून दे असे सांगितले आणि त्याला आपल्या घरातील कार वॉशिंग ची मशीन दिली यावेळी या मशिनी मधून विद्युत प्रवाह जोरदार वाहू लागल्याने तसेच या मशीनमध्ये शॉर्टसर्किट असल्याने रजित शॉक लागून खाली कोसळला खाली पाणी साचले असल्याने त्याच्या अंगामध्ये विद्युत प्रवाह संचारला.
यावेळी येथील मालकाने त्याला दवाखान्यात दाखल करण्याऐवजी गेटच्या बाहेर त्याला उचलून ठेवले आणि हात हातावर ठेवून फक्त पहात राहिले यावेळी रजतच्या वडिलांच्या मित्रांना ही घटना समजली त्यानंतर त्यांनी लागलीच त्यांच्या आई-वडिलांना घटनास्थळी बोलावून रुग्णवाहिकेमधून दवाखान्यात पाठवले.
ज्यावेळी त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यावेळी तो थोड्या प्रमाणात प्रतिसाद देत होता मात्र यावेळी डॉक्टरांनी त्याला आधी अर्धा तास आधी दाखल केले असते तर तो बचावीला असता असे सांगितले त्यानंतर रजीतचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता सभागृहात पाठवला.
यावेळी कार मालक दवाखान्यात त्याला घेऊन जाणे ऐवजी पोलीस स्थानकात हजर होता. यावेळी पोळी स्थानकासमोर ही घटना माणुसकीला कलंक फासणारी असल्याने मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले होते.
यावेळी रंजीत च्या आईने देखील टिळकवाडी पोलीस स्थानकासमोर आपला हंबरडा फोडला. यावेळी रजितची आई डी मीडियाशी बोलताना म्हणाली की माझा एकुलता एक 14 वर्षांचा मुलगा होता घरची परिस्थिती हालाखीची असल्याने सकाळी उठून तो पेपर घरोघरी टाकायचा. आणि त्यानंतर शाळेला जायचा. आठव्या इयत्तेत ठळकवाडी हायस्कूल मध्ये शिकत होता आता दसऱ्याची सुट्टी असल्याने एक चार पैसे मिळतील आणि आपला दसरा चांगला होईल हा विचार करून त्याने गाडी धुण्यास होकार दिला मात्र त्याचा हा शेवटचा क्षण होता असल्याचे सांगितले. तसेच जर कारमालकाने त्याला वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल केले असते तर आज माझा मुलगा माझ्यासोबत राहिला असता त्या व्यक्तींना जराही माणुसकी नाही माझ्या मुलाला त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी गेटच्या बाहेर आणून टाकले ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये काहीतरी झाले असून आम्ही तक्रार दाखल करण्याकरिता टिळकवाडी पोलिस स्थानकात आलो आहे. माझ्या पोटचा गोळा आज गेला असे सांगून हंबरडा फोडला.
या घटनेची तक्रार रजतच्या पालकांनी पोलीस स्थानकात केली असून पोलीस याबाबत अधिक तपास करण्यात गुंतले आहेत तसेच त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे.
m9vh3i