विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाकडून कोडणीत चिकोत्रा नदी स्वच्छता मोहीम
कोडणी-चिखली आंतरराज्य पूलानजिक मोठ्या प्रमाणात चिकोत्रा नदीपात्रामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, बाटली, कचरा, पाला पाचोळा साचून राहिला होता . यामुळे मोठी दुर्गंधी येत होती. यामुळे आजूबाजूच्या नागरीकांना याचा त्रास होत होता. तसेच यामुळे नदीचे पाणी दुषीत होत चालले होते. दूषित पाण्यामुळे जनावरे मोठ्या प्रमाणात आजारी पडत होते. यांची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषदचे जिल्हाध्यक्ष श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प. पू प्राणलिंग स्वामीजी यांनी निपाणीसह, कोडणी येथील बजरंग दलाच्या कार्यकत्यांबरोबर स्वच्छता मोहीम राबविल्याने चिकोत्रा नदीने मोकळा श्वास घेतला. या उपक्रमाचे कोडणी परिसरात कौतूक होत आहे.
कोडणी परिसराची जिवनदायीनी म्हणूण चिकोत्रा नदीचा उल्लेख केला जातो. या नदीच्या पाण्यावरच कोडणीसह महाराष्ट्रातील चिखली, खडकेवाडा, बेळंकी ही गावे अवलंबून आहेत. बुद्धिहाळ येथे चिकोत्रा नदीवर बंधारा निर्माण झाल्यापासून नदीला गतवर्षीपासून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे परिसरातील २ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र पाण्याखाली आले आहे.
विश्व हिंदू परिषद चे जिल्हा अध्यक्ष श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू प्राणलिंग स्वामीजी यांनी निपाणी आणि कोडणी येथील बजरंग दल चा कार्यकर्ते यांना घेवून चीकोत्रा नदी ची स्वच्छ केले.
यावेळी बोलताना प्राणलिंग स्वामीजी म्हणाले,की नदी ही आपली आई आहे आपल्या हिंदू संस्कृती आपण सगळ्या मध्ये ईश्वर पाहत मनुष्याचे जीवन हे पंच महाभुत या पासून बनले आहे त्यातील पाणी हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते पूर्थवी वर पिणाचे पाणी खूपच कमी आहे ते जपून वापरले पाहिजे तसेच चिकोत्रा नदी मुळे आजूबाजूचा गावातील ही शेती नदीचा पाण्यामुळे उतम पीक तेथील शेतकरी घेत आहेत पण प्रत्येकाचे कर्तव्य आहे की जसे आपल्याला ही चीकोत्रा नदी जगवते तसेच आपण ही ती स्वच्छ राखली पाहिजे इथून पुढे नदी मध्ये कोणत्याही प्रकार चे प्लॅस्टिक पिशवी,बाटली,कचरा नदी मध्ये कोणीही टाकु नये म्हणून आपण सर्वजण खबरदारी घेवूया
मानवाला पाणी म्हणजे जिवन आहे.
त्यामुळे सर्वांनी पाणी काटकसरीने वापरले पाहिजे. चिकोत्रा नदीमुळे आजूबाजूचा गावातील शेतकरी समृद्ध झाले आहेत. प्रत्येकाला चिकोत्रा नदी जगवते, त्यामुळे नदी दूषित न करता यापुढे ती स्वच्छ राखण्याचे कर्तव्य सर्वांनी पार पाडावे असे सांगीतले. स्वयंसेवकांनी संकलन केलेल