बेळगाव:आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सीडब्ल्यूएफआय ने चलो बेंगलोर चा नारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सी डब्ल्यू एफ आय चे कर्नाटक राज्य अध्यक्ष बाळकृष्ण शेट्टी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, फॅक्टरी वर्कर्स, ग्रामपंचायत वर्कर्स, बांधकाम कामगार, मध्यान आहार योजनेतील कर्मचारी, जनरल कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने त्वरित पूर्ण कराव्यात या मागणीसाठी सी डब्ल्यू एफ आय च्या नेतृत्वाखाली येत्या 5 मार्चपासून 8 मार्चपर्यंत बेंगलोर येथील फ्रीडम पार्क येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य आंदोलनामध्ये राज्यभरातून सुमारे 50 हजार कर्मचारी सहभागी होतील अशी त्यांनी माहिती दिली.
बांधकाम कामगारांना सरकारकडून विविध सुविधा देण्यात येतात. पण सध्या बांधकाम कामगार या सर्व सुविधांपासून वंचित आहेत. तेव्हा या सर्व कामगारांना या सर्व सुविधांचा लाभ त्वरित मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डेथ क्लेम , लग्नासाठी आर्थिक मदत तसेच लॅपटॉप अशा विविध सुविधा बांधकाम कामगारांना सरकारकडून दिल्या जातात.
पण सध्या बांधकाम कामगारांना या सुविधा मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व मागण्या त्वरित पूर्ण व्हाव्यात यासाठी चलो बेंगलोर असा नारा देण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले. तीन मार्च रोजी फॅक्टरी वर्कर्स, 4 मार्च रोजी ग्रामपंचायत वर्कर्स, पाच मार्च रोजी बांधकाम कामगार, 6 मार्च रोजी मध्यान आहार योजनेतील कर्मचारी, 7 मार्च रोजी जनरल वर्कर्स आणि आठ मार्च रोजी अंगणवाडी कर्मचारी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सीआयटीयु बेळगाव जिल्हा गौरव अध्यक्ष सी .ए. खराडे, बेळगाव जिल्हा जनरल सेक्रेटरी जी .एम. जैनेखान, बांधकाम कामगार संघटना निपाणी चे अध्यक्ष दिलीप वारके, बेळगाव जिल्हा लालबावटा संघटनेचे सेक्रेटरी धनंजय कांबळे हे उपस्थित होते.