This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*सृजन – २०२४’ विज्ञान महोत्सवाचा सोहळा……*

*सृजन – २०२४’ विज्ञान महोत्सवाचा सोहळा……*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘बेळगाव:एस. के. ई. सोसायटीच्या जीएसएस महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक १२ व १३ ऑगस्ट रोजी ‘सृजन-२०२४’ हा विज्ञान महोत्सव साजरा केला. या महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी दि. १२ ऑगस्ट २०२४ सकाळी १०.३० वाजता एस.के. ई. संस्थेचे व्हाईस चेअरमन. एस्. वाय. प्रभू यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या फोटोचे पूजन व फुग्यांचे अनावरण करून करण्यात आले. उद्घाटनावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ए. ए. हलगेकर, ‘सुजन’ महोत्सवाचे समन्वयक डॉ. संदीप देशपांडेम, IQACसमन्वयक प्रा. भरत टोपिनकट्टी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळी व उत्साही विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

या महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा व तरुण युवा पिढीचा वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा या हेतूने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले होते. या महोत्सवात सेरेबॉक्स- प्रश्नमंजुषा, स्कायफोरम वादविवाद, विश्वकला-चित्रकला, हार्मोनिया हस्टल- नृत्य, रिदमिक रिबेलियन -गायन, कॉस्मिक क्लिक-फोटोग्राफी, कैरोस मास्टर अँड मिस आणि डेडलिफ्ट-शरीरयष्टी इत्यादी प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये बेळगावमधील पदवीपूर्व कॉलेज व महाविद्यालयातील एकूण १४८ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता.

‘सृजन-२०२४’ या सहाव्या वर्षीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान महोत्सवाचा सांगता समारंभ दिनांक १३/८/२०२४ रोजी के. एम. गिरी सभागृहात सायंकाळी ४ वाजता पार पडला. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य, प्रभुत्व, नेतृत्व आदी गुणांची वाढ व्हावी म्हणून विविध स्पर्धा घेतल्या होत्या. त्याचे बक्षीस वितरण पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दंतवैद्य डॉ. वर्षा साठे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एस. के. ई. संस्थेचे व्हाईस चेअरमन एस्. वाय. प्रभू, जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य ए.ए. हलगेकर, विज्ञान महोत्सवाचे समन्वयक डॉ. संदीप देशपांडे व रमेश कटांबळे, सर्व प्राध्यापक वर्ग, विजेते स्पर्धक, विद्यार्थी उपस्थित होते. या महोत्सवाला महाविद्यालयाचे प्राचार्य ए.ए. हलगेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. वर्षा साठे यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या, ‘सृजन’ नावातच Innovation आहे. या कार्यक्रमामुळे त्यांना आपल्या कॉलेज जीवनातील दिवस आठवले असे वक्तव्य केले. तसेच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षक, मेंटर यांचीही भुमिका तितकीच महत्त्वाची आहे असे सांगून ससा आणि कासवाच्या गोष्टीद्वारे त्यांच्या जीवनाला मिळालेले वळण सांगितले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधील एकसंघता, नोकरी, छंद यातून मिळणारा परमोच्च आनंद आणि आरोग्याची काळजी याविषयीचे अनमोल विचार त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले एस. के. ई. संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रा. एस. वाय. प्रभू यांनी प्रथम सर्व विद्यार्थी स्पर्धकांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांमध्ये महत्त्वाची असणारी एकसंघता, विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग असे अध्यक्षीय मनोगत मांडले. त्यानंतर सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ए.ए. हलगेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.पी.एस्. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. रमेश कटांबळे यांनी महोत्सवाचा अहवाल वाचला. प्रा. चारुशिला

बालिकाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सृजन महोत्सवाचे समन्वयक डॉ. संदीप देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी मोठ्या दिमाखात व जल्लोषात सर्वसाधारण अजिंक्यपदाचा चषक आणला. ‘सृजन-२०२४’ या महोत्सवाचा विजेतागोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स बीबीए या महाविद्यालयाला व उपविजेतेपद आर. एल. एस. पदवीपूर्व कॉलेज यांना घोषित करण्यात आले. असा हा सोहळा दोन दिवसांनी संपन्न झाला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24