बेळगाव: अशोक नगर येथील KSR.CBSE स्कूलमध्ये कराटे बेल्ट प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.के एस आर सीबीएससी स्कूल व कम्पलेट कराटे अकॅडमी कर्नाटका यांच्या वतीने कराटे बेल्ट परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते.या परीक्षेमध्ये 160 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
बेल्ट प्रदान कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिस्टर एशिया बॉडी बिल्डर नागेंद्र माडीवाल हे उपस्थित होते.
https://www.instagram.com/reel/DGa_i8mhOM7/?igsh=MWtkZHpreDJ6c3YzdQ==
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व श्री गणेश मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. स्कूलच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
नंतर परीक्षेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर व मान्यवरांच्या हस्ते येल्लो बेल्ट विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सबीना लोबो, व्यवस्थापक चंद्रमती वेरणेकर, सुरज वेर्णेकर, यांच्यासहित कराटे विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.https://dmedia24.com/the-injured-cows-were-treated-at-a-go-to-school/