वृद्धाश्रमात महिला दिन साजरा
बसवन कुडची येथील नागनुरी श्री शिवबसेश्वर ट्रस्टचे श्रीमती चन्नम्मा हिरेमठ आणि एंजल फाउंडेशन च्या वतीने येथील वृद्धाश्रमात महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वृद्धाश्रमातील आजींना आपुलकीने आणि मायेने एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी जीव लावला.
प्रारंभी त्यांनी वृद्धाश्रमातील आजींकरिता केक आणून त्यांच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा केला.
त्यानंतर आजींना खाऊचे वाटप केले यावेळी मीनाताई बेनके यांनी आजींवर दाखवलेले प्रेम पाहून माझी देखील भारावून गेल्या आणि त्यांनी मीनाताईंना भरभरून प्रेम दिले आणि आशीर्वाद दिले.
तसेच त्यांचे कार्य असेच चालत राहो अशा शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत प्रज्ञा शिंदे, पूजा, भारती बुडवी उपस्थित होत्या.