गाणीग विकास महामंडळ संघटनेची स्थापना केल्याने विजय उत्सव साजरा
बेळगाव जिल्ह्यात आज गाणीग विकास महामंडळ संघटनेची स्थापना करण्यात आली. राज्य सरकारने दिलेल्या अधिकृत आदेश बेळगाव जिल्ह्यात गाणीक संघटनेची स्थापना करणे शक्य झाली असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष रमेश उटगी यांनी सांगितले ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की गाणीक समाज हा अत्यंत मागासलेला समाज आहे मात्र आपल्या समाजाकडे सरकारची दुर्लक्ष झाले होते पण आता सरकारने अधिकृत आदेश जारी केले असल्याचे आम्ही सरकारचे गाणी समाजाच्या वतीने आभार मानत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
शहरात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या समाजाबद्दल माहिती दिली आणि शासनाचे आभार मानले.
यावेळी ते म्हणाले की गाणी महामंडळाची स्थापना केल्याने आपल्या समाजाला शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगती करण्यास मार्ग मोकळा झाला आहे महामंडळ स्थापन केल्याने आपल्या समाजातील मुलांना सर्व समाजाप्रमाणे शिक्षणात दर्जा मिळण्यास सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
त्यामुळे आपल्या समाजाच्या मुलांनी ही संधी न दडवता सरकारला त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले पाहिजे असल्याचे मत यावेळी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी गाणीक समाज स्थापन करण्याचा आदेश सरकारने दिल्यांनी स्थानिक समाजातील सर्व सदस्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि फटाके फोडून मिठाई वाटली तसेच विजय उत्सव साजरा केला.
त्याचबरोबर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले यावेळी महिला संघटनेचे अध्यक्ष प्रा शोभा गानगेर, प्रकाश बाळेकुंद्री, राजीव गांधी अप्पा कोटी कल्लाप्पा गाडगे शकुंतला तेली बसवराज तेली गंगाधर मध्यमणी प्रकाश बाळेकुंद्री यांच्यासह गाणी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.