बेळगाव:बाल दिनाच्या औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने अनोखा उपक्रम राबविला. कणबर्गी जवळ झोपडपट्टी वस्तीमध्ये जाऊन लहान मुलांसोबत एंजल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मीनाताई बनके यांनी केक कापून साजरा करण्यात आला.तसेच झोपडपट्टीतील मुलांना बिस्किट व चॉकलेट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षा मीनाताई बेनके,उपाध्यक्ष दीपक सुतार सामाजिक कार्यकर्ते अवदुत तुडयेकर , तसेच झोपडपट्टीतील रहिवासी उपस्थित होते.