ड्रग्स विरोधी दिवस साजरा
पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय मध्ये धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत ड्रग्स विरोधी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि स्वागत गीताने झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुनाथ सर यांनी केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बसवराज सोफीमठ यांनी विद्यार्थ्यांना ड्रग्स विरोधी दिवस निमित ड्रग्स घेतल्याने आपल्या शरीरावर ते कसा परिणाम होतो. तसेच आपल्या कुटुंबीयांवरती त्याचा परिणाम होतो.
त्याचबरोबर समाजामध्ये याचे निर्बंध आणले पाहिजेत. यासाठी सुरुवात आपल्यापासून केली पाहिजेत आणि दुसऱ्यांनाही ड्रग्स घेण्यापासून थांबविले पाहिजे, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सेक्रेटरी प्रकाश नंदिहळी सर यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर कॉलेजच्या प्राचार्या ममता पवार यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुराज सर आणि आभार प्रदर्शन मयूर नागेनहट्टी यांनी केले.