*अगसगे गावात जागतिक महिला दिन साजरा*
बेळगाव: जिल्ह्यातील अगसगे गावात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता किल्लेकर तर अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे अप्त सहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. https://dmedia24.com/shri-amit-subramanian-at-icrd-2025-international-conference/
कार्यक्रमात मलगौडा पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनावर भर देत महिलांना समाजातील भूमिका सशक्त करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले, “महिला ह्या समाजाचा आधारस्तंभ आहेत. त्यांना सक्षम करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. शिक्षण आणि स्वावलंबनाद्वारे महिला स्वतःच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.”
या प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देनावर, उपाध्यक्ष शोभा कुरेन्नावर, पीडीओ एन.ए. मुनावर, निंगवा पाटील, उमा कोलकर, गुंडू कुरेन्नावर, अपय्यगौडा पाटील, लक्ष्मी सनदी या सर्वजण व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात गावातील महिलांनी सहभाग घेतला आणि महिला सक्षमीकरणावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमाद्वारे गावातील महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व सहभागींनी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एकत्रितपणे काम करण्याचे संकल्प व्यक्त केले.