संत मीरा शाळेत जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा.
बेळगाव ता,4. शरीर, मन ,बुद्धी, आत्मा परमात्मा, यांचे मानसिक संतुलन चांगले असणे गरजेचे असून सूर्यनिरपेक्षितपणे काम करतो वेळेवर येतो वेळेवर जातो असेच आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी योगा, प्राणायाम ,सूर्यनमस्कार केल्यास शरीर निरोगी राहते असे प्रतिपादन योग धाम प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक अनिल लोकूर यांनी संत मीरा शाळेत रथसप्तमी निमित्त मार्गदर्शन करताना आपले विचार व्यक्त केले.
शाळेच्या माधव सभागृहात अनिल लोकूर फकीरापा येळूरकर मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती भारतमाता, ओंकार फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी रथसप्तमीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले यानंतर फकीरप्पा येळ्ळूरकर व अनिल लोकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर येळूरकर व लोकूर येणे मंत्रासहित प्राणायाम व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांच्या कडून करून घेतले याप्रसंगी गायत्री शेंद्रे, धनश्री सावंत, शिवकुमार सुतार ,नीला धाकलुचे, चंद्रकांत तुर्केवाडी, सुजाता होलकर, भारती बाळेकुंद्री, सह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.