बेळगाव:श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने आज श्री दुर्गा माता दौडिचा नवमीचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी सोमनाथ मंदिर ताशिलदार गल्ली येथे प्रमुख पाहुणे वंशज सरदार बाळाजी डुबल इनामदार, सदाशिवगड आणि सरसेनापती हांबिर राव मोहिते यांचे वंशज जयाजी मोहिते आणि उद्योजक प्रकाश चौगुले तसेच प्रकाश जुवेकर हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती करून दौडीचा ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली.
तशिलदार गल्ली,फुलबाग गल्ली,पाटील गल्ली,भांदुर गल्ली, तानाजी गल्ली करत शनी मंदीर येथे दौडीचि सांगता झाली. यावेळी व्यापीठावर प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार तशिलदार गल्ली विभागाकडून करण्यात आला. यावेळेस उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवव्याख्याते सौरभ करडे हे उपस्थित होते यांनी अफजल वध यावर सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना केले. मान्यवरांच्या हस्ते शनी मंदिर येथे आरती करण्यात आली. व त्यांनतर ध्येय मंत्र म्हणून सौरभ करडे, पुणे यांच्या हस्ते ध्वज उतरण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे सर्व प्रमुख उपस्थिती होते.