बेळगाव विश्वकर्मा जयंती समितीचे अध्यक्ष राघवेंद्र हवनूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात विश्वकर्मा समाजाच्या सदस्यांनी येत्या 17 सप्टेंबरला राज्यात होणारी श्री विश्वकर्मा जयंती सरकारी कार्यालय वगैरे सर्व स्तरांवर मोठ्या प्रमाणात साजरी केली जावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
दिनांक 17 सप्टेंबर रोजी श्री विश्वकर्मा जयंती असून जिल्हा प्रशासनाने ती मोठ्या प्रमाणात साजरी केली जावी अशा आशयाचे निवेदन यावेळी विश्वकर्मा समाजाच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले यावेळी ते म्हणाले की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्याबद्दल सांगितले आहे त्यामुळे ही जयंती ग्रामपंचायत सरकारी कार्यालय सरकारी शाळा अनुदानित शाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी केली जावी अशी मागणी केली.
याप्रसंगी रेणुका कणबरकर ज्योती सुतार रमेश देसुरकर दिव्यश्री देसुरकर राघवेंद्र हुवनुर यांच्यासह विश्वकर्मा जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.