संवेदनशील भागात शिवजयंती मिरवणुकांवर राहणार सीसीटीव्हीची नजर आयुक्तालयात बैठक
शिवजयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, पोलिसांनीही शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. मिरवणुकीच्या दिवसासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्हीचा वापर करण्यावरही पोलिसांचा भर आहे.संवेदनशील भागातील व मिरवणुकीत टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांन दिले आहे.
तसेच पांरपारिक वाद्यांनाच परवागनी..
मंडळांनी मिरवणुकीत केवळ पांरपारिक वाद्ये वाजवावी.डीजे वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार मनाई आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावे असे पोलिस आयुक्त डॉ. एम. बि.बोरर्लिंगय्या यांनी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शहरातील सार्वजनिक मंडळांनी नियमांचे पालन करुन करावे. तसेच, कोणत्याही धार्मिक तेढ निर्माण होवू नये या दृष्टीने मंडळाच्या वतीने उभारण्यात येणारे देखावे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सूचना केली पाहिजेत. . तसेच प्रत्येक मंडळाने स्वंयसेवक नियुक्त करावे,असे उपायुक्त टी.एस शेखर यांनी केल्या.
यावेळी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी, शिवरायांच्या मिरवणुकीत गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, येथे येणाऱ्या अडचणी वर उल्लेख करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावा तसेच मारुती गल्लीत होणारी महिलांची चेंगराचेंगरी रोखण्यासाठी महिला पोलीस नेमणूक करावी, मिरवणूक मार्गावरील,हेस्कॉमचे कर्मचारी उपस्थित पाहिजेत, अश्या विविध सूचना त्यांनी आयुक्तांना केल्या.
यावेळी राजू भातकांडे यांनी संवेदनशील भागातील सि. सि टिव्ही कॅमेरे अनेक ठिकाणाचे बंद अवस्थेत आहेत ते दुरस्थ करावे, मिरवणूक मार्गावर पोलीस बसगाडी थांबू नये अश्या सूचना त्यांनी केल्या.
प्रसाद मोरे यांनी एकाच ठिकाणी स्वागत कक्ष उभारण्याची परवानगी दिली जावी, तसेच धर्मवीर संभाजीराजे यांची मूर्ती समोर मंडप घालतेवेळी मूर्तीचा दर्शनी भाग सोडून घालावी जेणेकरून छत्रपती संभाजीराजे यांचे शिवरायांच्या मिरवणुकीत दर्शन व्हावे, मूर्ती मंडपामुळे झाकली जाऊ नये.
यावेळी उपस्थित शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव,मेघना लंगरकांडे, राजू भातकांडे, राहुल जाधव,प्रासाद पवार, जे बी शहपूरकर, प्रसाद मोरे, आदित्य पाटील,अरुण पाटील होते.