कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत पालकांसाठी आरोग्य तपासणी
कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने शाळेच्या पालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर लेक व्हू हॉस्पिटल त्याचबरोबर नेत्रदर्शन आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पार पडले. या शिबिरात डोळे तपासणी, बी.पी.मधुमेह,हाडांची तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या ऑडिटर मॅरीलीन कोरिया,शाळेचे ब्रँड अँबेसिडर समाजसेवक संतोष दरेकर, शाळेचे मुख्याध्यापक पी. एस.बिर्जे,लेक व्हू हॉस्पिटल व नेत्रदर्शन आय हॉस्पिटलचे कर्मचारी,शाळेचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या आरोग्य तपासणी शिबिराला पालकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून त्याचा लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लेक व्हू हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर व सिईओ डॉक्टर गिरीश सोनवालकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.रूपाश्री मगदूम,मार्केटिंग हेड दीपा मोदगेकर,गौतम खानपेठ, कपिल भोसले त्याचबरोबर नेत्रदर्शन आय हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री.उदयकुमार, टेक्निशियन मंजुनाथ इंगळे, आदित्य अलगुडेकर,मिस सबा व इतर कर्मचारी उपस्थित होते.