कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक जाहीर
30 एप्रिलला कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे येत्या 30 एप्रिल रोजी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका होणार असून दिनांक एक मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे
याबाबतचा आदेश काल जारी करण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक ही आठ वर्षानंतर होत आहे.
त्यामुळे आता दोन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी करण्याकरिता बेळगाव कार्यालयात अर्ज करता येणार आहे.
त्यानंतर मतदार यादीत समाविष्ट केलेले नावे 16 मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहेत.बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सात प्रभागांमध्ये सात जागांकरिता ही निवडणूक होणार असून ती रंगतदार होणार आहे.
कारण यातील प्रभाग क्रमांक एक दोन तीन पाच हे सामान्य करीत आहेत तर चार व सहा हे प्रमाण महिलांकरिता राखीव आणि सात क्रमांक चा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.