कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न.
कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली या ठिकाणी संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोर्डाचे सीईओ राजीवकुमार, स्कूल ऑडिटर मेरिलीन कोरिया, शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे,शाळेचा शिक्षकवर्ग,शाळा सुधारणा कमिटी सदस्य,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. https://dmedia24.com/the-distress-of-the-border-people-on-the-tights-of-delhi/
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली.त्यानंतर सरस्वती देवी फोटो पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर पाहुण्यांचे स्वागत करून मागील वर्षी,वार्षिक परीक्षेत पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा, त्याचबरोबर या वर्षीच्या वर्गातील आदर्श विद्यार्थ्यांना पुरस्कार, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक पी. एस. बिर्जे यांनी अहवाल वाचन केले. श्रीमती कोरिया यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.सीईओ राजीव कुमार यांनी पालकांना मार्गदर्शन करताना मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांचा सहभाग महत्त्वाचा असून पालकांनी आपल्या मुलांच्या शारीरिक व मानसिक दृष्टिकोनातून त्यांची योग्य काळजी घ्यावी असे मार्गदर्शन केले.यानंतर शाळा सुधारणा कमिटी व फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.विविध बालगीत, लोकगीत,कोळीगीत,भक्ती गीत यावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक या नाटकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा जीवनपट सादर केला.
त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2024 – 25 चे आदर्श विद्यार्थी म्हणून इयत्ता सातवीचे विद्यार्थी ऋषिकेश नवलनाथ महागावकर व आदर्श विद्यार्थिनी म्हणून सई सोमनाथ पाटील,उत्कृष्ट खेळाडू म्हणून आज्ञा अरुण जुवेकर यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक उदय पाटील यांनी केले तर आभार श्रीकांत काटकर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक धनाजी कुरणे,नीता गुंजीकर,मनीषा वड्डगोळ,तुषार कांबळे,राहुल कांबळे,रेणुका बागडी,संगीत शिक्षिका रेणुका सरमळकर, सुरेश सरमळकर, यास्मिन अत्तार यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला शाळेचा पालक वर्ग,शाळेचे देणगीदार,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.