के एल ई संस्थेच्या डॉ.संपतकुमार शिवणगी
कॅन्सर हॉस्पिटलचे उदघाटन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते करण्यात आले.
बेळगावातील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या कॅन्सर हॉस्पिटल उदघाटन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी,कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री शरण प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी तीनशे कोटी रुपये खर्च आला असून अत्याधुनिक उपकरणे या हॉस्पिटलमधे आहेत.तीनशे खाटांचे हे हॉस्पिटल कर्नाटक,महाराष्ट्र,तेलंगणा आणि गोवा राज्यातील कॅन्सर रुग्णांना वरदान ठरणार आहे.
के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा शाल आणि वीर राणी कित्तूर चन्नमाची मूर्ती देऊन सत्कार केला.
कॅन्सर रुग्णाची काळजी घेणे हे उदात्त कार्य आहे.डॉक्टरांनी सहृदय तेने रुग्णावर उपचार करावेत.
येथे येणाऱ्या रुग्णांना उत्तम उपचार मिळतील याची मला खात्री आहे.जगात कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.कॅन्सर तीस टक्क्यांनी पुढील काही वर्षात वाढणार आहे . कॅन्सर झाला म्हणजे रुग्ण आणि कुटुंब घाबरून जातात.यासाठी डॉक्टरांनी त्यांना उपचार आणि धीर देणे गरजेचे आहे असे उदगार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले.
सरकारच्या आयुष्यमान आणि अन्य योजनांमुळे जनतेला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.कॅन्सर बाबत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.म्हणजे निदान आणि उपचार चांगले होतील.कुटुंबातील महिलेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.यामध्ये बदल घडला पाहिजे.वेळीच उपचार होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.