शहापूर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे महत्वाचे दूरध्वनी क्रमांक असलेले कॅलेंडर प्रकाशन
बेळगाव :
शहापूर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या गरजेसाठी महत्वाचे दूरध्वनी क्रमांक असलेले कॅलेंडर प्रकाशित केले आहे.
या कॅलेंडरचे प्रकाशन शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. शिंमाणी, उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी तसेच पोलीस कर्मचारी संदीप बागडी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना निरीक्षक शिंमाणी म्हणाले की, “लोकांच्या दैनंदिन आयुष्यात तातडीच्या वेळी अशा प्रकारचे माहितीपूर्ण कॅलेंडर अत्यंत उपयोगी ठरते. मंडळाने घेतलेली ही सामाजिक उपक्रमाची पुढाकार स्तुत्य आहे.”
कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सचिव राजू सुतार, खजिनदार मंगेश नागोजीचे, तसेच पदाधिकारी हिरालाल चव्हाण, रावबहादूर कदम, हरी यलजी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाचे क्रमांक व माहिती देणारे हे कॅलेंडर सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.